मुंबई : दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार अजूनही पाकिस्तानमध्येच असल्याचे पुरावे समोर येत आहे. सुरक्षा एजन्सीने याचे काही पुरावे सादर केले आहे. दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे, दाऊद काय त्याचे साथीदारही पाकिस्तानातच वास्तव्याला असल्याचं समोर आलं आहे.
साथीदारांच्या दुबई-पाकिस्तान वाऱ्या
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदचे साथीदार जबी सादिक, जावेद छोटानी आणि मुंबई ब्लास्टचा आरोपी जावेद पटेल उर्फ चिकना देखील पाकिस्तानातच आहे. दाऊदचे हे साथीदार नियमित पाकिस्तान आणि दुबईच्या वाऱ्या करत असतात. दाऊदच परिवार देखील पाकिस्तानातच आहे, दाऊदची पत्नी महजबीन आणि मुलगी माजिया यांनी अमीरात एअरलाईन्सने दुबईहून कराचीची यात्रा केली.
दाऊदच परिवार पाकिस्तानातच
मुलगी माहरूख आणि जावई जुनैद मियांदाद ११ जानेवारी रोजी दुबईहून कराचीला आले होते, महजबीन १९ जानेवारी रोजी पुन्हा कराचीहून दुबईला गेले आणि २६ फेब्रुवारी रोजी दुबईहून कराचीला पोहोचली. या प्रमाणे दाऊदचा मुलगा मोईन आणि सून सानिया यांनी आपल्या मुलांसह मार्च आणि मे महिन्यात दुबई आणि कराची दरम्यान प्रवास केला.
दाऊदची संपत्ती
८० हजार कोटी रूपयांची जवळ-जवळ हजार कोटी रूपयांची बेनामी संपत्ती असल्याचा संशय.
३ हजार कोटी रूपयांच्या ५० प्रॉपर्टीज वेगवेगळ्या देशांमध्ये २०१३ मध्ये जप्त करण्यात आल्या होत्या.
दाऊदने ज्या देशांमध्ये गुंतवणूक केली आहे, यात ब्रिटन, सिंगापूर, यूएईए, स्पेन आणि मोरक्कोचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.