मुंबईत डेंग्युचं थैमान

मुंबईत डेंग्युचे ६८ रूग्ण आढळले आहेत.तर तीनजणाचा डेंग्युमुळे मृत्यू झालायं.यंदा ५७२ रूग्ण डेंग्युचे आढळल्यान मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जाग झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 10, 2012, 06:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत डेंग्युचे ६८ रूग्ण आढळले आहेत.तर तीनजणाचा डेंग्युमुळे मृत्यू झालायं.यंदा ५७२ रूग्ण डेंग्युचे आढळल्यान मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जाग झालंय.
मुंबईत दिवसा कडक ऊन्ह आणि संध्याकाळी पाऊस. या हवामानातील बदलाने शहरात साथीच्या आजारानी डोकं वर काढलंय.या साथीच्या आजारात डेंग्युमुळे तीन जणाचा मृत्यू झालाय. तर डेंग्युचे ६८ रूग्ण ऑक्टोबर महिन्यात आढळले आहेत. गेल्या वर्षी डेंग्युचे ४१६ रूग्ण होते. हेच डेंग्युचे रूग्ण यंदा ५७२ झाल्यामुळे मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जाग झालय. डेंग्युमुळे सप्टेंबर महिन्यात दोनजणांचा तर जुलै महिन्यात एकाचा मृत्यू झालाय.
गेल्यावर्षी मलेरियाचे मुंबईत ३९ हजार ८०० रूग्ण होते.यंदा १३ हजार मलेरियाचे रूग्णावर पालिकेने इलाज करत मलेरियावर नियंत्रण मिळवलंय. मलेरियाच्या नियंत्रणावर पालिका पाठ थोपटून घेत असताना डेंग्युचं थैमान रोखण्यात अपयशी ठरल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्युचा आजार रोखला नाही तर ‘मुंबईकरानो डेंग्युपासून सावधान’ असंच म्हणावं लागेल.