मुंबई : तुम्ही जर तुमच्या खात्यात २.५० लाख पेक्षा जास्त रक्कम भरत असाल, तर तुमच्या मागे इनकम टॅक्स विभागाचं शुक्लकाष्ठ लागण्याची दाट शक्यता आहे. कारण अर्थ खात्याने बँकांकडे खात्यात २.५० लाखापेक्षा जास्त कॅश भरणाऱ्यांची यादी मागवली आहे.
अडीच लाखांपेक्षा जास्त कॅश भरणाऱ्यांची यादी बँकांना आयकर विभागाला द्यावी लागणार आहे, या आधी १० लाखापेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांची यादी आयकर विभागाला दिली जात होती.
मात्र ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे, आणि त्यांनी आपल्या कर्जाची परतफेड करताना, तो आकडा २.५० लाखावर गेला, तर त्यांना चिंता करण्याचं कारण नसणार आहे, कारण ही डिपॉझिट नसेल, तर कर्जाची परतफेड असणार आहे.