वाढदिवस साजरा करू नका, राज ठाकरेंचा आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना आपला वाढदिवस न साजरा करण्याचे आदेश दिलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 11, 2013, 11:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना आपला वाढदिवस न साजरा करण्याचे आदेश दिलेत. १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यादिवशी मनसे कार्यकर्त्यांनी होर्डिंगबाजी करू नये, बॅनर लावू नयेत तसंच प्रसारमाध्यमांमार्फत जाहिरातीही देऊ नयेत, असे आदेश राज ठाकरेंनी दिले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या दु:खातून आपण अजूनही सावरलो नसल्यानं आपला वाढदिवस साजरा केला जाऊ नये, अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन एक वर्षही उलटलेलं नाही. यावर्षी मला माझा वाढदिवस साजरा करण्याची अजिबात इच्छा नाही. कारण, मी अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही’ असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय.

१९९० च्या दशकात शिवसेनेला महाराष्ट्रात सत्तेमध्ये आणणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचं गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. शिवसेनेशी फारकत घेऊन बाहेर पडलेल्या राज ठाकरेंचं बाळासाहेबांवरील प्रेम आणि आदर त्यानंतरही कायम होतं... ते आजतागायत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.