मुंबई : चेंबूरमधील अशोक नगर येथील पत्र्याच्या चाळीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रमेश कुऱ्हाडे असं या बालकाचे नाव आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा मुंबई लोकलला फटका बसला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिरांने धावत आहे. तर डहाणू येथे पावसाच कहर सुरु आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती आहे.
बोरीवली ते दादर दरम्यान पाऊस सुरु आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोद दिसून येत आहे. मुंबईतील रस्ते वाहतूकही मंद गतीने सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून पालघर आणि डहाणू परिसरात पावसाचा कहर सरुच आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने सूर्या आणि वैतरणा नदीला पूर आलाय. सूर्या नदीवरील मासवण पूल काल सकाळपासूनच पाण्याखाली आहे. त्यामुळे या भागातील वाहतूकही ठप्प आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.