दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई: कॉलेज निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय.त्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल करुन लवकरच विधिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे.
निवडणुकांच्या रणधुमाळीचं चित्र लवकरच आता कॉलेजा-कॉलेजात दिसणार आहे. कारण कॉलेजमध्ये खुल्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
20-22 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं कॉलेजात निवडणुका होत होत्या. मात्र हिंसा, घातपात, राडेबाजी यामुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीनुसार शरद पवारांनी कॉलेज निवडणुका बंद केल्या. त्यामुळं आता नव्यानं होणाऱ्या निवडणूका कशा असतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
त्या कशा असाव्यात, याबाबत काही पर्याय सरकारसमोर आहेत.
पर्याय क्र. 1 -
स्डुडंट कौन्सिल अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणुका होतील. इच्छुक उमेदवार विद्यापीठात अर्ज करतील.
आणि त्यासाठी विद्यापीठाअंतर्गत येणारे कॉलेज विद्यार्थी मतदान देतील
पर्याय क्र. 2 -
प्रत्येक कॉलेजमध्ये पाच स्टुडंट कौन्सिल सदस्यांची निवड होईल.
त्यासाठी त्या कॉलेजचे विद्यार्थी मतदान करतील.
नंतर विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांनी निवडून दिलेले प्रत्येक कॉलेजचे पाच सदस्य मतदान करतील.
या पर्यायांबाबत प्रत्येक विद्यार्थी संघटनेच्या दोन प्रतिनिधींना अहवाल देण्यास सांगण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.