कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Updated: Aug 23, 2016, 08:21 PM IST
कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर title=

मुंबई : गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

गणेशोत्सव काळात मुंबई - गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरुन वळवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. आता कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेण्याबाबत विचार करत आहोत. मात्र, गतवर्षी टोल सवलत दिली गेली असेल तर ती देण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्यात यावी, यासाठी मागणी केली जात होती. मंत्रालयात कोकणातील प्रमुख नेत्यांची आज मंत्रिमंडळासोबत बैठक झाली. यावेळी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या सुरक्षेवर चर्चा केली. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेचा सरकार विचार करत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे ही वाहतूक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन वळवण्यात आली आहे. 

दरम्यान, कोकणवासीयांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याने सरकारचा हा निर्णय म्हणजे देर आए दुरुस्त आए अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.