फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संजय निरुपम एकाकी

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन संजय निरुपम यांचा गुरुदास कामत यांनी निषेध केलाय. 

Updated: Jul 17, 2015, 09:19 PM IST
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संजय निरुपम एकाकी title=

मुंबई : फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन संजय निरुपम यांचा गुरुदास कामत यांनी निषेध केलाय. 

फेरीवाल्यांबाबतची भूमिका काँग्रेसला अमान्य असल्याचं कामत यांनी म्हटलंय. पक्षात नव्यानं आलेल्यांनी पक्षाची ध्येयधोरणे समजून घ्यावीत, असा टोला कामत यांनी निरुपम यांना लगावलाय. 

'अशा प्रकारच्या धमक्या देणं काँग्रेसच्या ध्येय धोरणांच्या विरुद्ध आहे. कायदा हाती घेऊन बेकायदेशीर गोष्टी करणं काँग्रेसला मान्य नाही. शिविगाळ, धमकी देणं असे प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांनी करू नये. काँग्रेसला देशसेवा आणि त्यागाची १३० वर्षांची परंपरा आहे. पक्षात नव्यानं आलेल्यांनी हे समजून घ्यावं आणि त्यानुसार वागावं', असं या काँग्रेसनं जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं गेलंय. त्यामुळे, निरुपम आपल्याच पक्षात एकटे पडल्याचं चित्र आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना मारहाणीची भाषा निरुपम यांनी केली होती. त्यावरुन कामत यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन निरुपम यांचे कान उपटलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.