www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या बंगल्यावर, रात्री उशीरा अपंगांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली.
अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय.
सरकारी योजनेअंतर्गत महिन्याला मिळणा-या 600 रुपयांची रक्कम 4 हजार रुपये एवढी वाढवण्यात यावी अशी अपंग आंदोलकांनी मागणी केली.
वर्षभरापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वत: या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं.
मात्र अजूनही यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नसल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे.
यामुळेच शेवटी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून आंदोलनाचं पाऊल उचलल्याचं आंदोलकांनी म्हटलंय.
जोपर्यंत अपंगांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मंत्रीसाहेबांचा बंगल्यातून बाहेर पडणार नाही असा इशारा दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.