www.24taas.com, मुंबई
26/11 हल्ल्यातले शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचं स्मारक पाडण्यात आलंय. मालाडमध्ये त्यांचं स्मारक आहे. या भागात बांधकामादरम्यान करकरे यांचं स्मारक पाडण्यात आलंय. मात्र बांधकामावेळी हे स्मारक काही काळापुरतं हटवलं जाईल असं आधीच ठरलं होतं, असा दावा बिल्डर लतेष गाडा यांनी केलाय.
बांधकाम पूर्ण झाल्यावर स्वखर्चानं हे स्मारक पुन्हा तयार केलं जाईल असंही बिल्डरनं स्पष्ट केलंय. जर बांधकामावेळी शहीद करकरेंचे स्मारक हटवलं जाणार होतं तर आधी ते तिथे बांधलेच कशासाठी असा सवालही उपस्थित होतोय.
हे स्मारक हटवल्यानं शहीद हेमंत करकरेंच्या पत्नी कविता करकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यावर ‘कामा` रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या रंगभवनच्या गल्लीत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. यातच एटीएसचे प्रमुख असणारे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला होता.