मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीचा उपयोग केवळ दुष्काळग्रस्तांसाठी केला जात नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही केला जातो, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे माहितीच्या अधिकारातून पुढे आलेल्या माहितीवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलेय.
अधिक वाचा : मुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च
मुख्यमंत्री सहायता निधी हा केवळ दुष्काळग्रस्तांसाठीच नाही. तर अन्य विभागांसाठीही आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतील २५ टक्के रक्कम ही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात येते. त्यातून हा खर्च करण्यात आला आहे. दुष्काळांसाठीचा पैशाचा यात वापर झालेला नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलेय.
अधिक वाचा : मुख्यमंत्री हे पाहा, दुष्काळासाठी नाना पाटेकरने काय केलं?
दरम्यान, सध्या राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाचे हात तोकडे पडत आहेत. अशा वेळी समाजातील सर्व थरांतून पै-पै गोळा करून मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केले जात आहेत. मात्र, या निधीवरच शासकीय अधिकाऱ्यांनी डल्ला मारलाय. या निधीचा वापर बॅंकॉक येथील नृत्यासाठी केला असल्याचे माहितीच्या अधिकारात धक्कादायक आणि गंभीर वास्तव उघड झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण केलेय.
Out of the third, 25% funds are reserved for cultural activities out of which we sponsored ppl in ques: D Fadnavis pic.twitter.com/cX0f9Xfjqy
— ANI (@ANI_news) October 24, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.