भाजप एकाकी; मुंबईत मांसविक्री बंदी ४ दिवसांवरून २ दिवसांवर!

मुंबई महानगरपालिका हद्दीतली चार दिवसांवरची मांसविक्रीची बंदी दोन दिवसांपुरती मर्यादित ठेवली जाणार आहे. 

Updated: Sep 11, 2015, 08:10 PM IST
भाजप एकाकी; मुंबईत मांसविक्री बंदी ४ दिवसांवरून २ दिवसांवर! title=

मुंबई : मुंबई महानगरपालिका हद्दीतली चार दिवसांवरची मांसविक्रीची बंदी दोन दिवसांपुरती मर्यादित ठेवली जाणार आहे. 

११ आणि १७ सप्टेंबर हे दोन दिवसच आता मांसविक्री बंदी असेल. तर १३ आणि १८  सप्टेंबरची मांसविक्रीवरची बंदी हटवण्यात आली आहे. यासंबंधी एक परिपत्रक महापालिका सभागृहात मांडलं जाणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवक त्याला मंजुरी देणार आहेत. 

अधिक वाचा - मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना'तून मोदी सरकारचा समाचार!

जैन धर्मीयांचं पर्युषण पर्व सुरु झालं आहे. त्यानिमित्तानं मुंबई महानगरपालिका हद्दीत मांसविक्री बंदीवर चार दिवसांची बंदी घालण्यात आली होती. 

अधिक वाचा - मांसविक्री करणारे सेना-मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

ऑक्टोबर महिन्यात प्रस्ताव आणून पुढील काळात कायमस्वरूपी पालिकेची चार दिवसांची बंदी मागे घेऊन दोन दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे. सर्व नगरसेवक एकवटल्यानं भाजप एकाकी पडले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.