मुंबई : मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेय.
मॉडेल बलात्कार प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने सुनील पारसकर यांना क्लीनचीट दिली. तर त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे पुराव्या अभावी सिद्ध होत नसल्याने न्यायालयाने सुनील पारसकर यांची निर्दोष मुक्तता केलीये.
सुनील पारसकर हे १९९३ बॅचचे पोलीस उपअधिक्षक आणि १९९७च्या बॅचचे आयपीएस आहेत. पारसकर यांच्यावर गोरेगाव येथे राहणा-या एका मॉडेलने बलात्कार केल्याची तक्रार मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल आणि पारसकर यांची एप्रिल २०१३ पासून ओळख होती. एप्रिलमध्ये मॉडेलने आपल्या भावाविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आपल्या भावाने आपल्या आईला मारहाण केल्याचा आरोप या मॉडेलने केला होता. मात्र दिंडोशी पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे दाद मागण्यासाठी ती पारसकर यांच्याकडे गेली होती.
यानंतर ऑक्टोबरमध्ये याच मॉडेलने तिच्या सोसायटीत राहणा-या एका तरुणाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली होती. याच दरम्यान मॉडेल आणि सुनील पारसकर यांची जवळीक वाढली. पुढे एका एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटवर त्या मॉडेलचा फोटो प्रसिद्ध झाला होता. याबाबत मॉडेलने आयपीएस आणि तत्कालीन नॉर्थ रिजनचे अपर पोलीस आयुक्त सुनील पारसकर यांची भेट घेतली. याप्रकरणी पारसकर यांनी तपासाचे आदेश दिले होते.
२ जानेवारी २०१४ रोजी वेबसाइटवर मॉडेलचा फोटो प्रसिद्ध करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच या गुन्ह्यातील सर्वांना अटक करण्यात आले होते. मॉडेलनं दिलेल्या जबाबानुसार नोव्हेंबर २०१३मध्ये पारसकर यांनी तिला एक फ्लॅट दाखविण्याच्या निमित्ताने नवी मुंबई येथे नेलं तिथे त्यांनी मॉडलवर ज़बरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा तिचा आरोप होता.
दरम्यान, तिने विरोध केल्यामुळे पारसकर यांनी माघार घेत तिची माफ़ी मागितली. पण, काही दिवसांनीच एका बिल्डऱची भेट घालून द्यायायची या निमित्तानं या मॉडेलला मड आयलंड येथील बंगल्यावर नेलं. तेथे तिच्यावर बलात्कार केला असं त्या मॉडेलने तिच्या जबाबात म्हटले होते. पुढे या दोघांमध्ये जवळीक येऊन महागड्या वस्तूंचा देवाणघेवाण झाली. आयफोन, महागडं घड्याळ, ३५ हजाराची पर्स, भेट वस्तू एकमेंकाना भेटवस्तू म्हणून दिल्या. एवढचं नाही तर ती मॉडेल सुनील पारसकर यांच्या पत्नीला ही भेटतं होती. मात्र, त्यांच्यात खडके उडू लागल्यानंतर मॉडेलने बलात्काराची तक्रार केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.