सरसंघचालक मोहन भागवतांकडून हिंदुत्वाचा पुनरूच्चार

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुनरुच्चार केलाय. मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदुत्व हीच देशाची ओळख असल्याचं भागवत यांनी म्हटलंय. तसंच प्राचीन संस्कृतीचा प्रसार करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. 

Updated: Aug 18, 2014, 02:40 PM IST
सरसंघचालक मोहन भागवतांकडून हिंदुत्वाचा पुनरूच्चार title=

मुंबई : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुनरुच्चार केलाय. मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदुत्व हीच देशाची ओळख असल्याचं भागवत यांनी म्हटलंय. तसंच प्राचीन संस्कृतीचा प्रसार करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. 

हिंदूस्थान हे हिंदूंचं राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते.
 
देशात राहणाऱ्या सगळ्या धर्मियांचा जगण्याचा मार्ग एकच आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन हिंदू संस्कृतीशी हा मार्ग मिळता जुळता आहे. त्यामुळे यापुढच्या काळात संपूर्ण विश्वात हिंदू धर्माचीच परंपरा प्रचलित होईल यासाठी विश्व हिंदू परिषदेनं प्रयत्न करावे असंही मोहन भागवत म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.