अंधेरी : काळीज पिळवटून टाकणारी आणि आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय अंधेरीत. इथल्या एका 80 वर्षीय महिलेला तिचा मुलगा, सून आणि नातीनं अंत्यत क्रूर पद्धतीनं मारहाण केलीय.
गेल्या तीन वर्षांपासून सुरेंद्र त्याची आई मायावती वैद्य यांना मारहाण करतोय. बुधवारी तर याचा कहरच झालाय. सुरेंद्र त्याच्या आईला क्रूरपणे मारहाण करत होता. आईचा पाय पंख्याला अडकवून तिला मारहाण करत होता आणि हे सगळं त्याची बायको आणि मुलगी शूट करत होत्या.
एका संस्थेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी डीएननगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. हा व्हिडिओ पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले.
पोलिसांनीही तातडीनं पावलं उचलत सुरेंद्र वैद्यवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय आणि त्याच्या बायको आणि मुलीलाही लवकरच अटक केली जाणारय. मायावती वैद्य यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.