मुंबई : महापालिका मतदार यादीतील 11 लाख नावे गहाळ झाल्याचे पडसाद स्थायी समितीतही उमटले आहेत.
मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ कसा झाला तसंच 11 लाख मतदारांची नावं गेली कुठे याच्या चौकशीचे आदेश स्थायी समितीने मुंबई मनपा प्रशासनाला दिलेत.
पुढच्या स्थायी समितीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच मतदार यादीतून मराठी नावं वगळण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.
मतदार यादीत घोळ झाला नसता तर बहुमत आमचेच होते, असा दावा भाजपने केला. मतदार यादीतल्या घोळ प्रकरणावर भाजपच्या दिलीप पटेल यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा घेण्यात आला.