मुंबई : मुंबईतील एका पोलिस स्टेशनमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणा-या महिलेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या महिलेने पोलिस स्टेशनमध्येच बिअर तोंडाला लावली आणि पोलिसांनी धमक्याही दिल्या. पण जेव्हा तिची दारूची नशा उतरली तेव्हा तिने पोलिसांची माफी मागितली.
सुनीता यादव असे या व्हिडीओत दिसणा-या महिलेचे नाव असून १७ सप्टेंबरला ही महिला एका रेस्टॉरन्टसमोर आरडा-ओरड करत होती. साधारण रात्री ३ वाजता तिला एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. पण इथेही महिला शांत बसली नाही. इथेही ती सोबत घेऊन आलेली बिअरच्या बाटलीतून बिअर पीत होती आणि पोलिसांना धमक्या देत होती.
बिअर पीत धमक्या देणा-या या महिलेसोबत काय करावे असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. पण जेव्हा या महिलेची सर्व दारू उतरली तेव्हा ती रडायला लागली आणि तिने पोलिसांची माफी मागितली. ही महिला पोलिस स्टेशनमध्ये सांगत होती की, ती घरून पळालेली आणि अनाथ मुलगी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.