पालिका निवडणुका : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी, भाजपाला धक्का

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींबरोबरच राज्यातील ५८ नगरपरिषदा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक १० नगरपरिषदा जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ नगरपरिषदा जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का दिला आहे. 

Updated: Nov 2, 2015, 07:46 PM IST
पालिका निवडणुका : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी,  भाजपाला धक्का title=

मुंबई : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींबरोबरच राज्यातील ५८ नगरपरिषदा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक १० नगरपरिषदा जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ नगरपरिषदा जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का दिला आहे. 

त्याशिवाय भाजपाच्या नेत्यांच्या जिल्ह्यातच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्हा आणि पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात भाजपाची पिछेहाट झाली आहे.

अधिक वाचा : Update : महापालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकाल

महानगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांचे निकालने जल्लोष करावा असे वातावरण सत्ताधारी भाजपामध्ये नाही. राज्यातील ५८ नगरपालिकांच्या निवडणूक निकालावर नजर टाकल्यास ही बाब लक्षात येईल. या ६१ नगरपालिकांपैकी

भाजपा – १०
शिवसेना – ५
तर शिवसेना + भाजपा ४
अशा १९ ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व आहे.
तर काँग्रेस – ८
राष्ट्रवादी काँग्रेस – ९
आणि काँग्रेस + राष्ट्रवादी – ४
अशा २१ ठिकाणी विरोधकांचे वर्चस्व आहे.

राज्यातील नगरपंचायत निवडणूक निकाल पक्षनिहाय

काँग्रेस - २४५,

भाजप - २४१ ,

राष्ट्रवादी - १९४ ,

शिवसेना - १०८ ,

काँग्रेस-राष्ट्रवादी - ४३९ ,

भाजप-शिवसेना - ३४९

अधिक वाचा : शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला

या निकालावरून एक बाब स्पष्ट होते की विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवणाऱ्या भाजपा-शिवसेनाला नगरपरिषदा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. एकीकडे सत्ताधाऱ्यांना अपेक्षित यश मिळाले नसताना दुसरीकडे भाजपाच्या दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये भाजपाला फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील ३ नगरपालिकांपैकी भाजपाला एकही नगरपरिषदा जिंकता आली नाही.

अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत भाजपची पिछेहाट 

पंकजा मुंडे यांच्या बीडमधील ४ नगरपालिकांपैकी ३ नगरपरिषदा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यातील ४ नगरपालिकांपैकी एकही नगरपरिषदा भाजपाला जिंकता आली नाही.

विधानसभा निवडणुकीत विदर्भात मुसंडी मारणाऱ्या भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी नाकारले आहे. विदर्भातील एकूण २७ नगरपालिक, नगरपंचायतींपैकी केवळ ३ ठिकाणी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौडामार्गमध्ये शिवसेना-भाजपाचा विजय झालाय, तर वैभववाडी नगरपालिकेत शिवसेना स्थानिक आघाडीसोबत सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. त्यामुळे इथे नारायण राणेंना धक्का बसलाय. पार्लमेंट ते पंचायत हा भाजपाचा नारा आहे. मात्र नगरपरिषदा निवडणुकीत बसलेल्या धक्क्याने भाजपाचा हा नारा यशस्वी होताना दिसत नाही. तर रत्नागिरीत मंडणगडमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवलेय. येथे आघाडीला मोठे यश मिळाले. तर रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये पोटनिवडणुकीत शिवसेना २, राष्ट्रवादी -२ अशा जागा मिळाल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.