मुंबई : मी कोणाकडे तिकिट मागायला गेलेलो नाही. मी आमदार असलो काय आणि नसलो तरी 'रुबाबात' राहणार असे सांगत आमचेच नेते माध्यमांमध्ये बातम्या पेरत आहेत, असा 'प्रहार' काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी स्वकीयांवर केला.
विरोधकांना नेहमी फैलावर घेणार राणे यांनी आज काँग्रेवर जोरदार हल्लाबोल चढवला. काँग्रेसमध्ये गटबाजी असून पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी असून आमचेच नेते माध्यमांमध्ये बातम्या देत असल्याचा घणाघात राणे यांनी केला.
कोणतीही निवडणूक आली की नाव सुचविणारे हेच आणि विरोध करणारे तेच नेते. असा उद्योग सध्या काँग्रेसमध्ये होत आहे. मी कुठलेही आव्हान स्वाकारायला तयार असतो. माझ्यात तशी ताकद आहे. मी आमदार असलो काय आणि नसलो काय, आपला रुबाब असाच राहणार, असे राणे म्हणालेत. मात्र, निष्ठावान आणि प्रामाणिक नेत्यांनाच तिकीट देण्याची मागणी राणेंनी यावेळी केली.
सरकारवर अंकुश ठेवणारे लोक पाहिजेत. त्यांनाच तिकिट दिले गेले पाहिजे. मात्र, इथं आपल्या माणसाला कसे घुसवायचे याचे राजकारण सुरु आहे, असा आरोप करताना राणे यांनी वांद्रे निवडणूक लढवणार नसल्याचा गौप्यस्फोट केला.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माझ्या घरी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान आले. ते निवडणुकीचे तिकीट घेऊन. तसे मॅडमचे आदेश आहेत, असे सांगितले. त्यामुळे मी ही निवडणूक लढविली, असे स्पष्टीकर राणे यांनी दिले. त्याचवेळी मला विधानपरिषदेबाबत कोणी विचारले नाही, असे स्पष्ट केले.
मी हायकमांडला भेटलो हे जरी खरे असले तरी मी सोनिया गांधीना कधी तिकीट मागयला गेलो नाही. मी सोनिया गांधीना भेटण्याआधी त्यांना एक पत्र लिहिले होते. त्यानुसार आमची भेट ठरली असल्याचं राणेंनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.