मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नाते आता हळूहळू खुलायला लागले आहे. याचा प्रत्यय आज आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भारत स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांची स्तुती केली आहे.
सध्या पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. पण तेथून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांवर स्तुती सुमने केली आहे. ते म्हणाले, मी शरद पवारजी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. त्यांनी स्वच्छ भारत मोहिमेला पाठिंबा दिल्याने भारत स्वच्छ होण्यासंदर्भात जागरूकता निर्माण होईल.
आज बारामती येथे शरद पवार आणि त्यांचे सर्व कुटुंबिय स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांची बातमी अनेक वृत्तपत्रांच्या ऑनलाइन एडिशनमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावर ट्विट करताना मोदींनी पवारांचे तोंडभरून कौतुक केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.