मुंबई : नाशिक महापालिकेला तब्बल ८ महिन्यांनंतर नवे आयुक्त मिळणार आहे. प्रवीण गेडाम यांची नाशिकचे नवे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत या संदर्भात माहिती दिली होती. आयुक्त नसल्यामुळे मी काही कामच करू शकत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत राज ठाकरे यांनी मागणी केली होती असे सूत्रांनी सांगितले.
त्यानुसार, राज ठाकरे यांनी विनंती मान्य करून ही नियुक्ती केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान,प्रवीण परदेशी आणि मिलिंद म्हैसकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीय...
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून ते काम पाहणार आहेत.
तर के. एच. गोविंदराज यांची हे राज्याचे नवे मदत व पुनर्वसन सचिव असणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.