पवई तलावात अनधिकृत बोटींवर रंगतायत धनदांडग्यांच्या पार्ट्या!

पैशाच्या जोरावर धनदांडगे कायदा आणि नियम कशा पद्धतीने धाब्यावर बसवतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. मुंबईतल्या पवई तलावात काही धनदांडग्यांनी पैशाच्या जीवावर नियम धाब्यावर बसवून अलिशान हाऊस बोट उभ्या केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या हाऊस बोटींवर रात्रभर पार्ट्या होतात. तसेच अनेक  काही अवैध गोष्टीही घडत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. 

Updated: Dec 10, 2014, 11:29 AM IST
पवई तलावात अनधिकृत बोटींवर रंगतायत धनदांडग्यांच्या पार्ट्या! title=

मुंबई : पैशाच्या जोरावर धनदांडगे कायदा आणि नियम कशा पद्धतीने धाब्यावर बसवतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. मुंबईतल्या पवई तलावात काही धनदांडग्यांनी पैशाच्या जीवावर नियम धाब्यावर बसवून अलिशान हाऊस बोट उभ्या केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या हाऊस बोटींवर रात्रभर पार्ट्या होतात. तसेच अनेक  काही अवैध गोष्टीही घडत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. 

पवई तलावात सध्या उभ्या असलेल्या सगळ्या हाऊस बोट अनधिकृत आहेत. खास कारणांसाठीच या हाऊस बोट्सचा वापर केला जात असल्याचं पुढ आलंय. दिवसा या हाऊस बोटींवर शुकशुकाट असतो. मात्र, रात्र होताच या बोटींवर शौकिन श्रीमंतांची गर्दी होते आणि मग रात्रभर पार्टीचा सिलसिला सुरु असतो. या पार्ट्यांमध्ये पैशावाल्यांचे शौक पुरवले जातात. या अलिशान हाऊसबोटींवर 'एसी'रुम्स् असून त्यामध्ये  सोफा, टीव्ही तसेच हुक्का अशा सर्व प्रकारच्या सुख सुविधा आहेत. रात्रभर रंगणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ललनांचा वावर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

काही हाऊस बोटींच्या टॉयलेटचं आऊटलेट तलावतील पाण्यात सोडून दिलं आहे. त्यामुळे तलावाच्या पाण्यात प्रदूषण वाढतंय. या हाऊस बोट्स  धनदांडग्याच्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाकडं डोळझाक करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. 

खरं तर मुंबई महापालिकेनं मासेमारीसाठी 'महाराष्ट्र एन्गलिंग असोसिएशन क्लब'ला परवानगी दिली असून  त्यासाठी काही नियम घालून दिलेत. मात्र, इथं मासेमारीऐवजी दुसरेच धंदे केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.  मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं एस वॉर्डला या अनधिकृत हाऊस बोट्सवर कारवाई करावी, यासाठी पत्रंही दिलंय. परंतु एस वॉर्डकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावरुन अनाधिकृत हाऊस बोट्स कुणाच्या आशीर्वादाने पवई तलावात विहार करीत आहेत हे वेगळं सांगायला नको... 

तसेच अनधिकृत हाऊस बोट्संवर कारवाई करण्याऐवजी नवीन हाऊस बोट बांधणीचे काम इथं सुरु असल्याचं पहायला मिळालं. ही सगळी परिस्थिती पहाता पैशाच्या जोरावर कायदा आणि निमय  कसा धाब्यावर बसवला जातो हे पुन्हा एकदा उघड झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.