मुंबई : मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच धावपळीनं आणि घाईगडबडीनं झालीय. आज रिक्षाचालकांनी एक दिवसाचा लाक्षणीक संप पुकारलाय. रिक्षावाल्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे मात्र आज हाल होणार आहेत. सुमारे ८० हजार रिक्षाचालक या संपात सहभागी होतायत असा दावा रिक्षा युनियननं केलाय.
नवीन रिक्षांच्या परवान्यांचे वितरण, उबेर, ओला यांच्या सारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांवर कारवाई आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा अशा मागण्यांसाठी रिक्षावाल्यांनी हा संप पुकारलाय.
दरम्यान, नेहमीप्रमाणे बेस्ट मुंबईकरांसाठी धावून आलीये. या संपाच्या कालावधीत बेस्टनं मुंबईकरांसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय.