मुंबई : फक्त ३०० रुपयांत 'मुंबई दर्शन' आणि 'मेट्रोची सफर' घडवण्यासाठी रिलायन्स इन्फ्रा कंपनीने स्थानिक टूर ऑपरेटर कंपन्यांबरोबर करार केलेत.
मेट्रोनं प्रवास करत दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक स्थळं पाहत फिरता येईल आणि नंतर मेट्रोनं परत येता येईल. रिलायन्स इन्फ्राच्या मुंबई मेट्रो वन प्रायवेट लिमिटेड कंपनीनं स्थानिक टूर ऑपरेटर कंपन्यांना सोबत घेऊन 'मुंबई दर्शन' ही योजना प्रवाशांसाठी आखली आहे.
मुंबईतील प्रमुख ठिकाणं पाहिल्यानंतर मेट्रोनं वातानुकूलित प्रवास करता येईल अथवा आधी मेट्रोनं प्रवास करून नंतर प्रेक्षणीय स्थळं पाहता येतील. अर्थात,प्रवासाबाबत कोणतंही बंधन नसून प्रत्येक स्थानकाच्या आसपास असलेली ठिकाणं पाहत मेट्रोनं फिरता येईल.
प्रत्येक मेट्रो स्थानकावर या योजनेची माहिती देण्यात येतेय. 'मुंबई दर्शन' करण्यासाठी एक दिवस आधी तिकिटं आरक्षित करावी लागतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.