रस्त्यावर पार्क होणा-या गाड्यांचेही पार्किंग शुल्क वसूल करण्याचे आदेश

 रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क केल्यांमुळे निर्माण होणा-या समस्येवर मात करण्यासाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून महापालिकेनं निश्चित केलेल्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिका-यांना दिल्यात. 

Updated: Sep 18, 2016, 10:37 PM IST
रस्त्यावर पार्क होणा-या गाड्यांचेही पार्किंग शुल्क वसूल करण्याचे आदेश

मुंबई :  रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क केल्यांमुळे निर्माण होणा-या समस्येवर मात करण्यासाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून महापालिकेनं निश्चित केलेल्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिका-यांना दिल्यात. 

दरम्यान, रात्रीच्यावेळी रस्त्यावर पार्क होणा-या गाड्यांचंही पार्किंग शुल्क वसूल करण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले. त्याचप्रमाणे पार्किंग झोननुसार महासभेनं जे दर निश्चित केलेत त्या दरानं वसुली करावी असही सूचित केलं. 

धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्तीचा देकार मागवून एजन्सी निश्चित करण्यात येणार असून ट्रॅफिक वॅार्डच्या माध्यमातून ही वसुली करण्यात येईल. 

त्याचप्रमाणे रात्रीच्यावेळी ज्या गाड्या महापालिकेच्या रस्त्यावर पार्क करण्यात येतात त्या गाड्यांसाठी विशेष सशुल्क पास व्यवस्था करण्यात येणार असून महासभेने ठरविल्या शुल्कानुसार संबंधितास वार्षिक किंवा एका महिन्याचा पास देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.