www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पंतप्रधानपदासाठीचा दावेदार असल्याची शक्यता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फेटाळून लावलीय. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही त्यामुळं याबाबत प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी सोलापुरात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार पंतप्रधान झाले तर मला आवडेलच अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. तर काही वेळातच तुळजापुरात राहुल गांधींनाच पंतप्रधानपदासाठी आपला पाठिंबा असल्याचं सांगत आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलं.
हॉटेल ‘ताज’मध्ये राष्ट्रीय कृषी वसंत महोत्सवाची माहिती दिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार पंतप्रधान झाले तर आनंदच होईल. ते १९९२ पासून पंतप्रधानपदाच्या चर्चेत आहेत, पण दिल्लीतील राजकारणाने त्यांचा घात केला असे विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी केले होते. त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधून पंतप्रधान होणार का, असा सवाल करताच पवार म्हणाले, ‘अहो, मी लोकसभा निवडणूकच लढविणार नाही, तर पुढचे विचारताच कशाला? असं शरद पवार म्हणाले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.