24taas.com, मुंबई
दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यासाठी विशेष पथक मुंबई पोलिसांनी स्थापन केलयं. देशातलं अशा प्रकारचं हे पहिलं पथक असणार आहे. हॉस्टेज निगोशिएशन पथक असं त्याचं नामकरण करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांशी संवाद साधण्याचं काम हे पथक करणार आहे. या पथकातल्या अधिका-यांना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांकडून प्रशिक्षण देण्य़ात आलयं.
दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेणं शिवाय चर्चेद्वारे शरणागती पत्करतील का याचा अंदाज घेणं अशी काम या पथकाची असतील.
मुख्य बाब म्हणजे रक्तपात रोखणे आणि जिवितहानी होणार नाही याची काळजी घेणं या पथकाचं काम असेल. ओलिस नाट्यात या पथकाची भूमिका महत्वाची असणार आहे.
मुंबईचे सहपोलीस आयुक्त रजनिश सेठ यांच्या नेतृत्वाखाली या पथकाची स्थापना करण्यात आलीय. पथकात एकूण १७ पोलीस अधिका-यांचा समावेश आहे.