मुंबई : शिस्त आणि वक्तशिरपणासाठी सातासमुद्रा पार प्रसिद्ध असणारे मुंबईचे डब्बेवाले त्यांच्या एकजुटीसाठी ही प्रसिद्द आहेत. कुठल्याही वादामधे डब्बेवाले कधीच पहायला मिळत नाहीत. पण सध्या एका होवू घातलेल्या खानावळी मुळे मुंबईच्या डब्बेवाल्यांन मधे वाद पहायला मिळतोय.
हजारो मुंबईकरांना वेळेत डब्बा पोहचवण्यासाठी मुंबईचे डब्बेवाले प्रसिद्द आहेत. गेल्या सव्वाशे वर्षांपासून त्यांची ही परंपरा अखंडित सुरु आहे. ऊन वारा पाऊस याची चिंता न करता आपल काम करणाऱ्या या डब्बेवाल्यांना मध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. कारण आहे त्यांचेच सहकारी असणाऱ्या सुभाष तळेकर हे सुरु करत असलेल्या ख़ानावळीचे.
सुभाष तळेकर हे डब्बावाला संघटनेचे प्रवक्ते म्हणुन माध्यमांमधे प्रसिद्द आहेत. डब्बेवाल्यांचा आरोप आहे की सुभाष तळेकर हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी डब्बा वाहतूक संघटनेच्या नावाचा गैरवापर करत स्वताची खानावळ सुरु करत आहेत, त्यामुळे डब्बेवाल्यांच नुकसान होणार आहे.
तर दुसरीकडे सुभाष तळेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असं सांगत या खानावळी साठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या नावाचा कुठलाही वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. अनेक परप्रांतीयांच्या खानावळी मधून मुंबईकरांना डब्बे पोहचवणाऱ्या डब्बेवाल्यांना त्यांच्यातल्याच एकाने स्वतःची खानावळ सुरु केली तर अडचण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या संघटनेमध्ये कधीही न पहायला मिळालेली धूसफुस या खानावळीमुळे पहायला मिळतेय की ही खानावळ फक्त निमित्त आहे आणि आणखी काही कारणे संघटनेमधील धुसफुसीला कारणीभूत आहेत हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नावजलेल्या संगठनेमध्ये अशा कोणत्याही कारणाहुन मतभेद होणे हे दुर्दैवीच म्हणावं लागेल.