www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेच्या विषयावर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही असं उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. भाजपासोबत आमची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. त्यामुळे युतीच्या विस्ताराचा निर्णय आम्ही परस्पर सहमतीनं घेऊ असं उद्धव यांनी सांगितलं. आरपीआय नाराज नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय.
नरेंद्र मोदींच्या उत्तराखंड दौ-यावरुन शिवसेनेत गोंधळ उडालाय. मोदींच्या या दौ-यावर टीका करणारा अग्रलेख पक्षाचं मुखपत्र असलेल्या `सामना`मधून प्रसिद्ध झालाय. त्यानंतर काही तासांतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अग्रलेखावर खुलासा केलाय. नरेंद्र मोदींना आमचा विरोध नाही. ते चांगले काम करत आहेत. सामनामधील अग्रलेखाचा राजकीय अर्थ काढू नका असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
मोदींवर लिहीलेल्या अग्रलेखाचा राजकीय अर्थ नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घुमजाव केलं असलं तरीही काँग्रेसचे नेते मात्र मोदींवर टीका करतच आहेत. १५००० गुजराथी भाविकांना वाचवल्याचा दावा करत असलेले मोदी सुपरमॅन आहेत का असं विचारत रेणूका चौधरी यांनी त्यांची खिल्ली उडवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.