मुंबई : भाजपनं विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय... याचा काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी धिक्कार केलाय. भाजपनं पहिल्याच दिवशी लोकशाहीचा आणि घटनेचा खून केलाय अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिलीय. तसंच, पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय.
'अल्पमतात असलेल्या शासनानं विधिमंडळाला काळिमा फासलाय... सरकारनं विश्वासदर्शक ठराव पायदळी तुडवलाय... खरं तर मतदान व्हायला हवं होतं... भाजपसोबत कोण कोण होतं... किती मतं मिळतात... हे महाराष्ट्राला समजायला हवं होतं... दूध का दूध... पाणी का पाणी व्हायला हवं होतं... हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसण्याचा प्रकार आहे' असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलंय.
'अंदर की बात.... राष्ट्रवादी भाजप के साथ है...' असं म्हणतानाच भाजपचेच काही आमदार देवेंद्र फडणवीस सरकारला मतदान करणार नव्हते, असा आरोपही यावेळी कदम यांनी केला.
'त्यांचेच आमदार त्यांच्यासोबत नाहीत... आपलं भांडं फुटू नये, म्हणून आवाजी मतदानानं हा विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्यात आला.... खरं म्हणजे, खडसेंच्या घरी जमलेले 'ते' ४० आमदारही भाजपला मतदान करणार नव्हते...' असा बॉम्बच रामदास कदम यांनी टाकलाय.
'घटनेचा खून पाडून आवाजी मतदानानं... मतदान घ्यायला हवं होतं... याचा आम्ही निषेध करतोय... देवेंद्र फडणवीस यांना नियम चांगले समजतात... तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडा आणि बहुमत सिद्ध करून दाखवा' असं आव्हानंच विरोधकांनी फडणवीस सरकारला दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.