मुंबई : हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि सलमानला रडू कोसळलं.
मुंबई : पडद्यावरचा दबंग सलमान खान पहिल्यांदा कोर्टात रडला तो दोषी सिद्ध केल्यानंतर, आणि पुन्हा रडला तो शिक्षा सुनावल्यानंतर , लाखो तरूण-तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, सलमानवर आज न्यायालयात पुन्हा-पुन्हा रडण्याची वेळ आलीय.
दुसऱ्यांदा रडला सलमान
सलमान खानला न्यायमूर्तींना आपल्याला दोन वर्षांच्या आत शिक्षा देण्याची विनंती केली, आपण सामाजिक कार्य करत असल्याचे दाखले देखिल सलमान खानने दिले. सलमान खानच्या वकिलाने तीन वर्षाच्या शिक्षेची मागणी केली, मात्र न्यायालयाने शिक्षा सुनावतांना पाच वर्षाची सुनावल्यानंतर सलमानला रडू कोसळलं आणि काही वेळाने त्याने प्यायला पाणीही मागितलं.
सलमानची रवानगी आर्थर रोड जेलला
सलमान खानची रवानगी आता आर्थर रोड जेलला होणार आहे, त्याला घेऊन जाण्यासाठी पोलिसांची गाडी दाखल झाली तेव्हा सलमान सोबत त्याच्या जवळच्या लोकांचा त्याला गराडा होता, सलमान खानला आधी वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रूग्णालयात नेण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
दोषी ठरवलं तेव्हा पहिल्यांदा रडला सलमान
हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि सलमानला रडू कोसळलं.
सलमानला शिक्षा सुनावताच त्याचा भाऊ अरबाज आणि सोहेल खान न्यायालयातून बाहेर पडले.
न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला दोषी ठरविताच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. काही वेळातच त्याच्या डोळ्यात अश्रू कोसळू लागले.
निकालानंतर सलमानची बहीण अलवीरा रडू लागली, तर त्याच्या आईची तब्येत खालावली.
दरम्यान, २०१० मधील हिट अँड रन खटल्यात अभिनेता सलमान खान याला न्यायालयाने आज दोषी ठरविण्यात आले आहे, सलमानला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
सलमान खान यांच्या वकिलाने ३ वर्षांपेक्षा कमी शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.