राष्ट्रवादीच्या नेत्याला छोटा राजन टोळीकडून धमकी

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय दिना पाटील यांना धमकी मिळालीय. छोटा राजन याच्या टोळीकडून संजय दिना पाटील यांना धमकी देण्यात आलीय. 

Updated: Feb 6, 2015, 10:28 AM IST
राष्ट्रवादीच्या नेत्याला छोटा राजन टोळीकडून धमकी title=

मुंबई : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय दिना पाटील यांना धमकी मिळालीय. छोटा राजन याच्या टोळीकडून संजय दिना पाटील यांना धमकी देण्यात आलीय. 

या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाफर आणि नीलेश पराडकर यांनी फोनवरून संजय दिना पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. 

यापैंकी, नीलेश पराडकर छोटा राजनचा हस्तक असल्याचं म्हटलं जातं. भांडुप पोलिस स्थानकात गुन्हा आयपीसीच्या ५०६ आणि ५०२ कलमाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यानंतर, दोन्ही आरोपी फरार आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.