मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयीत प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा कबुली जबाब दिलाय. ताण, अशक्तपणा आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याने इंद्राणीला ग्लानी आली होती. त्यात ती बेशुद्ध पडल्याची माहिती पुढे आली आहे.
अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड : प्रकरण दाबलं जात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं होतं - इन्स्पेक्टर
तुरुंग महानिरीक्षक बिपिन कुमार सिंग यांनी इंद्राणीबाबात खुलासा केलाय. तिच्या आजारपणात कोणताही घातपात नाही. तसेच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला नाही. दरम्यान, हिंदूजा रुग्णालयाचा रिपोर्टमध्ये रक्तात मादक पदार्थ आढल्याचे म्हटलेय. मात्र, तपासणी ही प्राथमिक असून अल्पप्रमाणात हे प्रमाण असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा : इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई, DNA रिपोर्टचा शिक्कामोर्तब: मुंबई पोलीस
भायखळा येथील कारागृहात २ ऑक्टोबरला सकाळी इंद्राणीला चक्कर आली. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. तिला दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर ४८ तास डॉक्टरांनी नजर ठेवली होती. ती कोमात गेल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, तिसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आल्यानंतर तिला ६ ऑक्टोबरला पुन्हा तरुंगात आणले गेले.
इंद्राणी बेशुद्ध पडल्याचे कारण तुरुंग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे दिले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्राणी आजारी पडल्याने चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे तुरुंग प्रशासन चांगलेच हादरले होते. इंद्राणी शुद्धीवर आल्याने सर्व प्रकरणावर पडता पडला. इंद्राणीने केलेल्या खुलाशाने आणि तरुंगातील सीसीटीव्हीतील पाहणीनंतर कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचे पुढे आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.