मुंबई : राज्य सरकारनं कांदा खरेदीचा प्रस्ताव पाठवला नसल्याच्या झी 24 तासच्या वृत्तावर खुद्द पणन मंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केलंय. व्यापा-यांनी संप मागे घेतल्यामुळं सरकारनं कांदा खरेदी सुरू केली नसल्याचं अजब स्पष्टीकरणं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
कांद्याचे दर पुन्हा पडल्यामुळं सरकार लवकरच खरेदी सुरू करणार असल्यांचं त्यांनी सांगितंलय. प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा विचार सरकार करत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच पैसे कीलोने कांदा विकला गेला ही वस्तुस्थिती नसल्याचा दावा देशमुखांनी केलाय. तो सडका कांदा होता असं त्यांचं म्हणणंय. यासंदर्भात चौकशी करून आणि दोषी असल्यास व्यापा-यांवर कारवाई करु असंही त्यांनी नमूद केलं आहे.