महाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा वाद

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे सत्ता संघर्ष नवा नाही...बाळासाहेब ठाकरे- राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार, गोपीनाथ मुंडे- धनजंय मुंडे सत्ता संघर्ष कायमच चर्चेचा विषय ठरतो. त्यात आता भर पडली आहे ती सुनिल तटकरे यांच्या कुटुंबाची.

Updated: Aug 17, 2014, 09:03 PM IST
महाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा वाद title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे सत्ता संघर्ष नवा नाही...बाळासाहेब ठाकरे- राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार, गोपीनाथ मुंडे- धनजंय मुंडे सत्ता संघर्ष कायमच चर्चेचा विषय ठरतो. त्यात आता भर पडली आहे ती सुनिल तटकरे यांच्या कुटुंबाची.

राजकीय सत्तेचा वारसदार कोण यावरुन काका-पुतण्यांमधील सत्ता संघर्ष किंवा शह-काटशाहाचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलाय. आता एका नव्या घराण्याचा कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कुटुंबात...तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर श्रीवर्धन मतदार संघात त्यांचा वारसदार कोण याची चर्चा सध्या सुरु झालीय. सुनिल तटकरे यांची कन्या आदिती, मुलगा अनिकेत, पुतणे अवधूत तटकरे हे सुनिल तटकरे यांचे वारसदार होण्यास इच्छुक आहेत. सुनिल तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे आमदार असून त्यांचा मुलगा अवधूत तटकरे हे रोह्याचे नगराध्यक्ष आहेत. तेदेखील आता श्रीवर्धनवर दावा करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अद्यापपर्यंत उमेदवार ठरला नसल्याचं सांगून याप्रकरणी काहीही भाष्य करत नाहीय.

सत्तेचे वारसदार कोण यावरू महाराष्ट्रात अनेक मोठ्या घराण्यात वाद निर्माण झालेत. सध्या श्रीवर्धन मतदार संघाचं उत्तरदायित्व कोणाकडे यावरून तटकरे कुंटूबातही राजकीय चुरस निर्माण झालीये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.