मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर आढळली संशयास्पद बोट सापडली आहे. रायगडच्या स्थानिक मच्छिमारांची कोस्टगार्डला ही माहिती दिली.
दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवर गस्त वाढविण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या बोटीचा तपास कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे.
दरम्यान, उरी हल्ल्यानंतर देशात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. कोणत्याही संशयास्पद हालचालींकडे लक्ष ठेवण्यात आले आहे. कालच भारताने LOCमध्ये घूसून दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यात 30 ते 35 दहशतवादी ठार झाले होते.