नव्या मंत्र्यांचे खातेवाटप : शिवसेनेची बोळवण, महत्वाची खाती भाजपकडेच

भाजप सरकारमध्ये शिवसेना दाखल झाल्यानंतर प्रथमच युती सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातंवाटप जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडे जलसंपदा, ऊर्जा, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, परिवहन उद्योग आणि पर्यावरण खातं देण्यात आले आहे. महत्वाची खाते भाजपने आपल्याकडेच ठेवलीत.

Updated: Dec 6, 2014, 02:39 PM IST
नव्या मंत्र्यांचे खातेवाटप : शिवसेनेची बोळवण, महत्वाची खाती भाजपकडेच title=

मुंबई : भाजप सरकारमध्ये शिवसेना दाखल झाल्यानंतर प्रथमच युती सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातंवाटप जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडे जलसंपदा, ऊर्जा, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, परिवहन उद्योग आणि पर्यावरण खातं देण्यात आले आहे. महत्वाची खाते भाजपने आपल्याकडेच ठेवलीत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा शुक्रमवारी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर आता आज खातेवाटप जाहीर झालीत. शिवसेनेकडे भाजपने सार्वजनिक बांधकाम खातं दिले. एकनाथ शिंदे यांना हे खातं मिळालंय. तर काल समावेश झालेल्या गिरीश बापट यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं दिलंय. संसदीय कार्यमंत्रालयही त्यांच्या़कडे देण्यात आलंय.

भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खात्याची धूरा सोपवण्यात आलीय. शिवसेनेच्या दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन, सुभाष देसाईंकडे उद्योग तर रामदास कदम यांच्याकडे पर्यावरण खातं देण्यात आलंय. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महत्वाचे ऊर्जा खाते सोपविण्यात आले आहे.

शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य खाते देण्यात आलंय. राजकुमार बडोले यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खातं देण्यात आलंय. मात्र, पुन्हा एकदा भाजपने कुरबोडी करत शिवसेनेला कमी महत्वाची खाती दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री या खात्यांचे वाटप केलेले नाही. ते स्वत:कडे ठेवले आहे. शिवसेनेने या खात्यांवर दावा केला होता. मात्र, पुन्हा एकदा सेनेला ठेंगा दिलाय.

कॅबिनेट मंत्री :

> गिरीश बापट : अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य

गिरीश महाजन : जलसंपदा

> दिवाकर रावते : परिवाहन

> सुभाष देसाई : उद्योग 

> रामदास कदम : पर्यावरण

> एकनाथ शिंदे : सार्वजनिक बांधकाम 

चंद्रशेखर बावनकुळे : ऊर्जा,नवीन व नवीकरणीय ऊर्जा

बबनराव लोणीकर : पाणी पुरवठा व स्वच्छता

डॉ. दीपक सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

राजकुमार बडोले : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

राज्यमंत्री :

राम शिंदे : गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन

विजय देशमुख : सार्वजनिक बांधकाम, परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग

संजय राठोड : महसूल

दादाजी भुसे : सहकार

विजय शिवतारे : जलसंपदा, जलसंधारण

दीपक केसरकर : वित्त, ग्रामविकास

राजे अंबरिशराव आत्राम : आदिवासी विकास 

रवींद्र वायकर : गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण

डॉ. रणजित पाटील : गृह (शहरे), नगरविका, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, संसदीय कार्य 

प्रविण पोटे : उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.