www.24taas.com, मुंबई
बिबटे किंवा वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
वनराज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. यापैकी एक लाख रुपये रोख आणि चार लाख रुपये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर डिपॉझिट म्हणून ठेवलं जाईल. तसंच हल्ल्यामध्ये कायमस्वरुपी अपंग झालेल्या व्यक्तिला चार लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिला एक लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती जाधव यांनी दिलीय.
चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यांसदर्भात शोभा फडणवीस यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वनराज्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. या संदर्भातला जीआर ३० मार्च रोजी राज्य शासनानं काढला असला तरी मदतीचे नियम एक जानेवारीपासून लागू करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.