मध्य रेल्वे विशेष ब्लॉक: आज रात्री १२ ते उद्या सकाळी ६ दरम्यान ब्लॉक

मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाला अखेर आज मध्यरात्रीचा मुहूर्त मिळालाय. मध्यरात्री १२ ते सोमवार पहाटे ६ वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत एकही उपनगरी लोकल धावणार नाही.

Updated: Jun 7, 2015, 04:20 PM IST
मध्य रेल्वे विशेष ब्लॉक: आज रात्री १२ ते उद्या सकाळी ६ दरम्यान ब्लॉक title=

मुंबई: मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाला अखेर आज मध्यरात्रीचा मुहूर्त मिळालाय. मध्यरात्री १२ ते सोमवार पहाटे ६ वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत एकही उपनगरी लोकल धावणार नाही.

याआधी 'मरे'नं शनिवार आणि त्यापूर्वी २३ मे रोजीचे परिवर्तनाचं काम अचानक पुढं ढकललं होतं. २५०० डीसी वरून २५ हजार एसी प्रवाह करण्यासाठी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रात्री शेवटची लोकल पकडणाऱ्या प्रवाशांना रात्री १२ पूर्वीच्या लोकल पकडाव्या लागतील. 

सोमवारी पहाटे ६.१६ वा. पहिली लोकल अंबरनाथहून सीएसटीच्या ​दिशेनं सुटेल तर दुसरी लोकल टिटवाळ्याहून स. ६.३२ वा. सीएसटीच्या दिशेनं सुटेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.