मुंबई : शिवसेनेसोबतच्या युतीपूर्वीच मुंबई भाजप इच्छुकांच्या गर्दीनं बेजार झालीय. महापालिकेच्या 227 जागांसाठी भाजपकडे अडीच हजारांपेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. भाजपनं प्राथमिक पातळीवर यातल्या 1700 इच्छुकांची निवड केलीय. मात्र यातल्या इच्छुकांच्या यादीला अंतिम स्वरुप देण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे.
भाजपचे शिवसेनेसोबत अजून जागावाटप झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांना थोपवून ठेवण्याचं आणि जागावापट झाल्यानंतर नाराजी रोखण्याचं खरं आव्हान भाजपसमोर आहे.