मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तीन लाखांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
खंडणी आणि मारहाणीच्या गुन्ह्या खाली जे जे मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इक्बाल कासकर याच्यासह त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
एका इस्टेट एजंटने इक्बालच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. तो न सापडल्याने पोलिसांनी त्याला फरार घोषीत केले होते. अखेर त्याला जे. जे. मार्ग पोलिसांनी आज अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.