मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरासरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय.
मेच्या दुसऱ्या आठवड्यात वाशीच्या घाऊक बाजारात १६०० रुपये क्विंटलनं मिळणारा कांदा आज २२०० रुपयांच्या घरात गेलाय. तर ११०० रुपये क्विंटलनं मिळाणारा फ्लॉवर आज १७०० रुपयांनी मिळतोय. वांग्यांचा भाव तब्बल ५४ टक्के वधारला असून कोबीच्या भावातही ४२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.
घाऊक बाजारातली ही स्थिती बघता किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात कमी पावसाचा अंदाज वर्तल्यापासूनच भाज्यांचे दर वाढायला सुरूवात झाली होती. बागायती शेतकऱ्यांनी पेरण्या लांबवल्यानं भाज्यांचे भाव पुढचा महिनाभर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
एप्रील - मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वाढती उष्णता यामुळे में महिन्यात भाज्यांचे भाव जास्त होते. जून महिन्यात देखील भाज्यांचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत १५ टक्के वाढले आहेत. परंतु पाऊस झाल्याने भाज्यांची आवक देखील दोन दिवसांपासून वाढली आहे. यामुळे घाऊकमध्ये भाजीचे भाव उतरले असले तरी किरकोळ बाजारात भाव चढ़े असल्याने भाज्या महागच मिळतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.