बायकोची बदनामीच्या संशयावरून मित्राला विवस्त्र करून मारहाण

बायकोची बदनामी करत असल्याचा संशयावरून एकाला त्याच्या मित्रानं विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीये. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 14, 2017, 05:26 PM IST
 बायकोची बदनामीच्या संशयावरून मित्राला विवस्त्र करून मारहाण  title=

मुंबई : बायकोची बदनामी करत असल्याचा संशयावरून एकाला त्याच्या मित्रानं विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीये. 

विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये राहणाऱ्या राजू भातपनूर याला त्याचा मित्र सचिन चौरे यानं आणखी एक मित्र कमलेश शेट्टी याच्या घरी बोलावलं. त्यावेळी तिघंजण आधीच दारू पित बसले होते. 

 

राजूलाही त्यांनी दारू पाजली आणि त्यानंतर बेदम मारहाण केली. त्याला सिगारेटचे चटकेही देण्यात आले. तब्बल तीन तास हा प्रकार सुरू होता. राजूचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. 

धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 12 तारखेला ही घटना घडूनही राजूनं कोणालाच सांगितलं नव्हतं. मात्र त्याच्या बहिणीनंच हा व्हिडिओ बघितल्यानंतर ती त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेली आणि तक्रार नोंदवली. 

पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून 1 जण फरार आहे. मात्र या प्रकरणावर राजू, त्याचे कुटुंबिय किंवा पोलीस काहीही बोलण्यास तयार नाहीत...