www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आलेली एक महिला एअरपोर्टवरून अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार घडलाय. नवी दिल्लीच्या गीता कॉलनीत राहणारी एक महिला ही महिला आहे. ही घटना 13 मेची आहे. गीता कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आलीय. मुंबईत याप्रकरणी तपास सुरू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार 26 वर्षीय सुनिता आपल्या बहिण संगीताच्या घरी मुंबईत येण्यासाठी भाऊ सुनीलसोबत दिल्लीहून निघाली. सुनीलनं सुनिताला दिल्ली एअरपोर्टवर सोडलं आणि तो आपल्या घरी परतला. सुनिता मुंबई एअरपोर्टवर पोहोचली तिथून तिच्या नवऱ्याला मकसूदला जवळपास रात्री 8.30 वाजता फोन केला आणि आपण मुंबईत पोहोचल्याचं सांगितलं.
त्यानंतर रात्री 9.30च्या सुमारास मकसूदनं सुनिताला पुन्हा फोन केला तर फोन बंद आला. मकसूदनं खूप वेळा फोन ट्राय केला. मग त्यानं सुनिताच्या बहिणीकडे संगीताकडे फोन केला. तेव्हा सुनिता घरी न पोहोचल्याचं कळलं. मकसूदनं तत्काळ पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी तपास सुरू केलाय. दिल्लीतील मकसूदसोबत 2004मध्ये सुनिताचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. सुनिताला बेपत्ता होऊन आता सहा दिवस झाले आहेत. मात्र तिचा काहीच पत्ता लागलेला नाही. सुनितासोबत काय घडलं, तिच्यावर काही संकट तर नाही ना आलं, यासगळ्या प्रश्नांमुळं तिच्या घरचे तर चिंताग्रस्त आहेतच पण पोलीसही या मिस्ट्रीला अजून सोडवू शकले नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.