झी २४च्या ट्विटनंतर बस सेवा पूर्ववत

 माध्यमांनी योग्य भूमिका घेतली तर विस्कळीत झालेली व्यवस्था सुरळीत होते. याचा प्रत्यय आज दिसून आला. झी २४ तासच्या एका ट्विटनंतर एलफिस्टन स्टेशन ते दूरदर्शन बस सेवा पुन्हा पूर्ववत झाली.

Updated: Jan 29, 2015, 09:10 PM IST
झी २४च्या ट्विटनंतर बस सेवा पूर्ववत title=

मुंबई :  माध्यमांनी योग्य भूमिका घेतली तर विस्कळीत झालेली व्यवस्था सुरळीत होते. याचा प्रत्यय आज दिसून आला. झी २४ तासच्या एका ट्विटनंतर एलफिस्टन स्टेशन ते दूरदर्शन बस सेवा पुन्हा पूर्ववत झाली.

तर घडलं असं शिवसेनेच्या सौ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे वाचनालयाचा उद्घाटन सोहळ्यानिमित्त व्यासपीठ उभारणीचे काम सुरू होते. त्यामुळे या मार्गावरील १६७ क्रमांकाच्या बसेस स्टेशनपासून न सुटता इंडिया बुल्सपासून सोडण्यात येत होती. यामुळे एलफिस्टन स्टेशन ते दूरदर्शन या मार्गावरील बस प्रवाशांना या उद्घाटनामुळे विनाकारण वेठीस धरण्याचे काम सुरू होते.

या वाचनालयाचे उद्घाटन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सायंकाळी ६ वाजता करणार होते. पण दुपारी १२ वाजेपासून बस सेवा एलफिस्टन स्टेशनपासून बंद करण्यात आली होती. यावर अनेक प्रवाशांचे झी २४ तासमध्ये फोन खणखणले. यावर झी २४ तासने एक ट्विट केले.

असे होते ट्विट

त्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे यांनी या ट्विटची दखल घेतली आणि शिवसेना प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांनी झी २४ तासशी संपर्क साधला. घडलेला प्रकार समजून घेतला आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी व्यासपीठ काढण्याचे आणि बस सेवा पुन्हा पूर्ववत करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार ट्विट केल्यानंतर काही मिनिटांतच चक्र फिरून बस सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी फेसबूक, ट्विटर आणि फोन करून झी २४ तासचे अभिनंदन केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.