www.24taas.com, झी मीडिया, अकोला
पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यात घडलीये. दारूच्या आहारी गेलेल्या पतीनं आपल्या पत्नीला 25 हजारात विकल्याची खळबळजनक घटना घडलीये. याप्रकरणी पती पुंडलिक चव्हाण आणि तिची खरेदी करणा-याला अटक केलीये.
दारूच्या आहारी गेलेल्या पुंडलीकनं आपल्या व्यसनासाठी थेट आपल्या पत्नीलाच विकायचं ठरवलं.... मध्यप्रदेशातल्या खरगौन जिल्ह्यातल्या रमेश पटोदे याच्याशी 25 हजारांत त्यानं सौदा केला. विशेष म्हणजे ही आपली बहिण आहे, अशी बतावणी त्यानं केली होती. आकोट तालुक्यातल्या जळगाव नहाटे या त्याच्या गावच्या ग्रामस्थांना हा प्रकार कळला आणि त्यांनी या महिलेला पोलिसांकडे नेलं. तिच्या तक्रारीवरून पुंडलिक आणि रमेशला अटक करण्यात आलीये.
दारूच्या नशेमुळे पुंडलिकनं पत्नीचे सर्व दागिने विकले. घरातल्या वस्तूही विकल्या. अखेरीस शेवटी त्यानं आपल्या पत्नीला विकण्यासही मागेपुढे पाहिलं नाही... व्यसनाधीनता माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवते, याचं ही घटना म्हणजे ढळढळीत उदाहरण म्हणता येईल...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.