www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा सध्या संघाचं मुख्यालयाच्या शहरात म्हणजेच नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे लोकसभा प्रचारप्रमुख समितीचे अध्यक्ष आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मैत्रिचा हात पुढे केलाय सोबतच त्यांचं तोंडभरून कौतुकही केलंय.
‘गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपचे एकुलते एक पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपींसारखे आहेत. परंतू मोदींची इमेज मात्र सेक्युलर नाही’ असं संगमा यांना वाटतंय. ‘लोक बाबरी मस्जिद विसरले तिथं गुजरात दंगा कुणाच्या लक्षात राहिल, लोक तेही विसरतील... भारताकडे संकटांना सहन करण्याची आणि त्यांना पचवण्याची शक्ती आहे’ असंही त्यांनी म्हटलंय. ‘नरेंद्र मोदी यांच्यात क्षमता आहे... बदल घडवण्याची इच्छा आहे... ते चांगले प्रशासकही आहेत... त्यांच्यात फक्त एक कमी आहे... ती म्हणजे, त्यांची इमेज एका सांप्रदायिक नेत्याची आहे’ असं ते म्हणतात.
‘फेडरल फ्रंट (तिसरी आघाडी) चालणार नाही, कारण यामध्ये भरपूर सारे नेतेच भरले जातील. भाजपची साथ सोडण्याचे परिणामही जेडीयूला भोगावे लागणार आहेत’ असं भाकितही पी. ए. संगमा यांनी केलंय.
गेल्या वर्षीपर्यंत संगमा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर होते. परंतू, राष्ट्रपती निवडणुकीत यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याविरुद्ध निवडणूक लढताना पी ए संगमा राष्ट्रवादीतून बाहेर पडले. तेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनंच संगमा यांना पाठिंबा जाहीर केला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.