www.24taas.com, झी मीडिया,भंडारा
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील सरपंचावर वाळू माफियाने जेवणाचे निमंत्रण देऊन विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर मोहगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
मोहाडी तालुक्यातील मोहगावचे सरंपच पुंडलिक डेंगे (५५) यांच्यावर दारूतून विषप्रयोग करण्यात आला. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. तेव्हापासून ते कोमात होते. काळ सायंकाळी ५ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गावकऱ्यांनी वरठी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली.
पोलीस या घटनेचा तपास करीत असून पोलिसांनी या प्रकरणात ३ जणांना अटक केली आहे. वाळू माफियांकडू त्यांची हत्त्या करण्यात आली आहे, असा आरोप गावकरी तसेच त्यांचा कुटुंबीयांनी केला आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून गावातून होणाऱ्या वाळू त्रासापासून गावांतील रस्ते खराब झाल्यामुळे सरंपच पुंडलिक यांनी वाळू माफियांना विरोध केला होता. गावातून वाळूची वाहतूक करू नका, अशी विनंती केली. त्याबाबत त्यांच्याशी बोलणीही केली. परंतु वाळू माफियाने या प्रकरणी सरपंच पुडलिक यांना पाशाचे आमिष देखील देण्यात आले. परंतु त्या समोर ते झुकले नाही. त्यानंतर चिडलेल्या वाळू माफियाने गावातील काही लोकांना सोबत घेऊन पुडलिक यांचा काटा काढायचा डाव रचला. त्यानुसार त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. ते तिथे गेले असता दारूमध्ये विष टाकून जेवण दिले.
या घटनेनंतर गावात वातावरण तापले असून गावकर्यांनी भंडारा ते मार्ग रोखून धरला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टायर जाळपोळ केली. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत या ठिकाणहून हटणार नाही, असा पवित्र घेतला. गावकरी आणि पोलीस यांचामध्ये वातावरण तापले असून या प्रकरणावर पोलिसांनी काहीही भाष्य करण्यास तूर्तास तरी टाळले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.