www.24taas.com, झी मीडिया, अकोला
अकोला जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य़कर्ते आणि सरपंच यांची गोळ्या झाडून तर भंडारा जिल्ह्यात विषप्रयोग करून सरपंचांची हत्या करण्यात आली आहे. वाळू माफियांचा हैदोस सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले हे.
या हत्येमुळे अकोल्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. दिवसा ढवळ्या काही अकोला शहराला लागून असलेल्या मलकापूर गावात सरपंच तर शिवसेनेचे उप-जिल्हा प्रमुख सिद्धेश्वर देशमुख यांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मालकापूर ग्रामपंचायत समितीच्या सरपंचाला गोळ्या घालून ठार केलंय.
गेल्या काही महिन्या पासून मलकापूर ग्रामपंचायत सदस्यांनमध्ये वाद उफाळला होता. तर काही दिवसांपूर्वी सभेच्या दरम्यान ग्रामपंचायतमध्ये प्रचंड नासधूस करण्यात आली होती. शिवसेनेच्याच दोन गटांत वाद होत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी गटातील काही लोकांनी सिद्धेश्वर देशमुख यांचा पाठलाग करून ग्रामपंचायतच्या जवळ असलेल्या एका घराच्या आवारात त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्या गंभीर असलेल्या सिद्धेश्वर देशमुख यांना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अद्यापही मारेकऱ्यांना अटक केलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा ताफा या परिसरात तैनात करण्यात आला असून शांतता पूर्ण तणाव आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.