www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या देवळा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे एका भक्ताचं लग्न जमत नसताना त्याने भक्ताचं लग्न नोंदणीपद्धतीने लावून दिलं आणि नववधूला घेऊन बाबा फरार झालाय.
देवळा तालुक्यातल्या वरवंडी गावात दिलीप जमुना प्रसाद तिवारी उर्फ हरीओम बाबा याने आपला आश्रम थाटला. शारीरिक, मानसिक आजार बरे करून देण्याच्या भूलथापा देत त्याने आपला भक्त परिवार वाढवला होता. अनेकांची त्याने फसवणूक केल्याचं उघड झालंय.
या प्रकरणात अनिसच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्यानंतर याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भोंदू बाबाचा पोलीस शोध घेत आहेत. अशा अनेकांची फसवणूक भोंदूबाबाने केली असल्याचा दावा अंनिसचे पदाधिकारी करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.